अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. इतकेच नाही तर सैफ अली खान व करीना कपूरदेखील तिचा अभिनय पाहून थक्क झाले आहेत. त्यामुळे करीना तिच्या परफॉर्मन्ससाठी पार्टीचे आयोजन करते आहे. या पार्टीमध्ये सारा व सैफच्या जवळचे व्यक्ती सहभागी होणार आहेत.
'केदारनाथ' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात साराने मुक्कू नामक मुलीची भूमिका केली आहे. या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. इतकेच नाही तर सैफ व करीना दोघांना चित्रपट खूपच आवडला आहे. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने सारासाठी पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमध्ये सारा व सैफच्या जवळचे मित्रमंडळींना बोलवण्यात येणार आहे.