Join us  

कतरिनाच्या लग्नानंतर करिनाने जे केलं ते पाहून सगळेच थक्क, क्रेझी फॅनने केली ‘पोलखोल’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 2:09 PM

Katrina kaif and vicky kaushal wedding : काय सांगता? ‘या’ एका गोष्टीसाठी करिनानं कतरिनाच्या लग्नापर्यंत प्रतीक्षा केली...!

कतरिना कैफ (Katrina Kaif)  व विकी कौशल  (Vicky Kaushal) आता पती-पत्नी आहेत. काल या कपलनं मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचे फोटोही शेअर केलेत. सध्या या  लग्नाची जोरदार चर्चा आहे. दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दीपिका पादुकोणपासून आलिया भटपर्यंत सर्वांनीच कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. या यादीत बेबो अर्थात करिना कपूरचंही  (Kareena Kapoor) नाव आहे. करिनाने केवळ विकी व कतरिनाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तर सोबत आणखी एक काम केलं. आता चाहत्यांच्या नजरेतून ते कसं सुटणार? होय, कॅट व विकीच्या एका चाहत्याने करिनाची ‘पोलखोल’ केलीच.बेबोने असं काय केलं तर, विकीसोबत लग्न होताच कतरिनाला सोशल मीडियावर फॉलो केलं.

एका चाहत्याने याची माहिती देत, एक ट्विट केलं. ‘कतरिना कैफला फॉलो करण्यासाठी करिना कपूरने तिच्या लग्नापर्यंत प्रतीक्षा केली,’ असं लिहित या चाहत्याने एक हसण्याचं इमोजी शेअर केलं.तुम्हाला ठाऊक आहेच की, कतरिना कधीकाळी करिनाचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी कतरिना व करिना यांच्यात चांगलीच मैत्री बहरली होती. पण कॅट व रणबीरचं ब्रेकअप झालं आणि तशी करिनाही कतरिनापासून दुरावली. आता कतरिना विकीची झाली म्हटल्यावर पुन्हा एकदा बेबो कॅटशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतेय, असं म्हणायला हरकत नाही. आता ही मैत्री कशी बहरते, ते बघूच.रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाच्या आयुष्यात विकी कौशलची एन्ट्री झाली. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि अखेर काल दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

टॅग्स :करिना कपूरकतरिना कैफविकी कौशल