Join us

ना हिंदू ना मुस्लिम, कोणत्या धर्माचं पालन करते करिना कपूर खान? तैमुरच्या नॅनी ललिता डिसिल्व्हाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 09:18 IST

तैमुर आणि जेहवर कोणत्या धर्माचे संस्कार होत असतील याबाबतही नेहमी चर्चा होते. याचा खुलासा नुकतंच तैमुरची नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी केला आहे.

बॉलिवूडमधील कपूर घराण्याची लेक करिना कपूर (Kareena Kapoor) २०१२ साली पतौडी घराण्याची सून झाली. अभिनेता सैफ अली खानशी तिने लग्न केलं. लग्नानंतर करिनाने तैमुर आणि जेह या दोन गोंडस मुलांना जन्म दिला. हिंदू कुटुंबात जन्म झालेल्या करिनाने मुस्लिम कुटुंबात लग्न केल्यानंतर ती कोणत्या धर्माचं पालन करत असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. तसंच तैमुर आणि जेहवर कोणत्या धर्माचे संस्कार होत असतील याबाबतही नेहमी चर्चा होते. याचा खुलासा नुकतंच तैमुरची नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी केला आहे.

करिना कोणत्या धर्माचं पालन करते यावरुन ललिता डिसिल्व्हा यांनी पडदा उघडला आहे. 'हिंदी रश' वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ललिता म्हणाल्या, "करिना खूपच शिस्तप्रिय आहे. तिची आई बबिता या देखील अतिशय कडक शिस्तीच्या होत्या. करिनामध्येही हा गुण आहे. आईप्रमाणेच करिनाही ख्रिश्चन धर्माचं पालन करते. ती मला तैमुर आणि जेहसमोर चर्चेमध्ये गायले जाणारे भजन लावायला सांगते. तिला हे खूप आवडतं. तसंच ती मुलांना प्रत्येक धर्माची शिकवण देते. अनेकदा ती 'एक ओंकार' हे पंजाबी भजनही लावायला सांगते. मुलांच्या सभोवताली सकारात्मक वातावरण असणं गरजेचं आहे असं ती म्हणते. तसंच ती कुटुंबासोबत होळी ते ईद प्रत्येक सण उत्साहात साजरा करते."

त्या पुढे म्हणाल्या,"करिना आणि सैफ खूपच साधे सरळ आहेत. घरात जे त्यांच्यासाठी बनवलं जातं तेच स्टाफही खातो. स्टाफसाठी वेगळं अन्न असं काही नसतं. तसंच तैमुर आणि जेहसोबत आम्हीही एकाच टेबलवर जेवायला बसायचो."

करिना आणि सैफ अली खानप्रमाणेच त्यांच्या मुलांचाही चाहता वर्ग मोठा आहे. कपूर फॅमिलीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  सांगायचं झालं तर, ललिता डिसिल्वा गेल्या अनेक वर्षांपासून तैमूर आणि जेह यांचा सांभाळ करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

टॅग्स :करिना कपूरतैमुरबॉलिवूडहिंदूमुस्लीम