Join us

'मला त्यांची आई व्हायचं नाही, त्यांना गरज...'; सावत्र मुलांविषयी करीनाची होती स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:02 AM

Kareena kapoor: सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) याच्या फिल्मी करिअरसोबतच त्याची खासगी आयुष्य सुद्धा कायम चर्चेत येत असतं. यात खासकरुन त्याच्या वैवाहिक जीवन हा मुद्दा तर चाहते चवीने वाचत असतात. त्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टी आजवर चर्चिल्या गेल्या आहेत. सैफने अभिनेत्री अमृता सिंग (amrita singh) हिला घटस्फोट दिल्यानंतर करीना कपूरसोबत लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये सैफ आणि करीनाचं (kareena kapoor) लग्न झालं. या लग्नानंतर करीनाने दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफ-अमृताची मुलं सारा (sara ali khan) आणि इब्राहिम यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्या दोघांना आईची गरज नाही, असं ती थेट म्हणाली होती.

सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं दिसून येत आहे.  या कार्यक्रमात करीनाने सैफ आणि त्याच्या दोन मुलांविषयी भाष्य केलं.

'२ मुलांचा पिता असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर त्या मुलांची दुसरी आई होणं ही जबाबदारी वाटली का?' असा प्रश्न करणने करीनाला विचारला होता. त्यावर करीनाने दिलेलं उत्तर चर्चेत आलं.

काय म्हणाली करीना?

"मी याकडे कधीच जबाबदारी म्हणून पाहिलं नाही. कारण, त्यांच्याकडे आधीच एक चांगली आई आहे. त्यामुळे त्यांना आईची गरज नव्हती. त्यांच्याकडे त्यांची आई होतीच ना. पण, त्यांना एका मैत्रिणीची नक्कीच गरज होती", असं करीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, " मी सैफला कायम सांगते, मला कधीच त्यांची आई व्हायचं नाहीये. त्यांची आई आहे. तिने त्यांना खूप छान पद्धतीने सांभाळलं आहे. त्यामुळे आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाहीत. पण, मी त्यांची चांगली मैत्रीण होण्याचा कायम प्रयत्न करेन. त्यांना जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्यांच्या सोबत असेन."

दरम्यान, करीना आणि सैफची दोन्ही मुलं सारा-इब्राहिम यांच्यात छान मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे त्यांच्या फोटो, व्हिडीओमधूनही त्यांच्यातील नातं दिसून येतं.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान सारा अली खानबॉलिवूडअमृता सिंग