Join us

"मी लोकप्रिय आहे का?" पापाराझींना पाहून तैमूरचा करीनाला प्रश्न, वाचा बेबोने काय दिलं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 18:58 IST

सारखे-सारखे आपल्या पाठीमागे येणाऱ्या पापाराझींना पाहून तैमुरला (Taimur) काय प्रश्न पडतात, याचा खुलासा नुकतंच करिनाने केला आहे. 

Taimur On Paparazzi  : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) ही कायमच चर्चेत असते. तिचा एक वेगळाच स्वॅग असतो. फक्त करीनाचा नाही तर तिची मुलेही कायम चर्चेत असतात. करीनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह. या दोघांचे त्यांच्या क्युट लुक्समुळे कायम फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पापाराझी त्यांचे फोटो क्लिक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फोटोग्राफर फोटोसाठी कायम त्यांच्या मागे असतात. तैमुर हात दाखवत पापाराझींना हॅलो करताना अनेकदा दिसून आला आहे. सारखे-सारखे आपल्या पाठीमागे येणाऱ्या पापाराझींना पाहून तैमुरला (Taimur) काय प्रश्न पडतात, याचा खुलासा नुकतंच करिनाने केला आहे. 

करीना कपूर खान गेली २५ हून अधिक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. लग्न, मुलांच्या जन्मानंतरही तिच्या करिअरला ब्रेक लागलेला नाही. 'जब वी मेट'ची गीत असो किंवा 'कभी खुशी कभी गम'मधली पू करीनाने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यामुळेच आता करीनाला मोठा बहुमान मिळतोय. करीना बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे, जिच्या नावाने मुंबईत फिल्म फेस्टिव्हल होणार आहे.  हे फेस्टिव्हल २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत १५ शहरे आणि ३० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये होणार आहे.

नुकतेच करीना ही चित्रपट महोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी "तुझ्या नावाने सिनेमहोत्सव सुरू होणार आहे, याची तैमूरला कल्पना आहे का?" हा प्रश्न विचारण्यात आला. यावर करीना म्हणाली की, "तो अजून खूप लहान आहे. त्यामुळे त्याला याबाबत कमी माहिती आणि समज आहे. पण, जेव्हा पापाराझी हे आमच्या मागे येतात, त्यावरून त्याला थोडी कल्पना आहे. तैमूर आणि मी एकत्र असताना तेव्हा पापाराझी आमचा पाठलाग करतात. तेव्हा तैमूर विचारतो, "हे सर्व लोक आपला पाठलाग का करत आहेत? मी लोकप्रिय आहे का?" त्यावर करीना तैमूरला म्हणते की, "तू नाही, मी लोकप्रिय आहे. तू प्रसिद्ध होशील, असं काहीही काम आजवर केलेलं नाही". यावर तैमूर म्हणतो, "ठीक आहे, मी आज प्रसिद्ध नाही, पण मी एक दिवस मीसुद्धा असं काही काम करेन आणि लोकप्रिय होईन".

याशिवाय करीनाने तैमूरला सध्या फुटबॉल खेळायला आवडत असल्याचं सांगितलं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द बर्किंगहम मर्डर' सिनेमात करीनाने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. तसेच करीना दिवाळीत रिलीज होणाऱ्या 'सिंंघम अगेन' सिनेमात अजय देवगणसोबत झळकणार आहे. काही दिवसांपुर्वी करीनाचा नेटफ्लिक्सवर 'जाने जान' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाद्वारे तिने ओटीटीवर पदार्पण केलं होतं. हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित होता.  

टॅग्स :करिना कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडतैमुरसैफ अली खान