Join us

Lakme Fashion Week 2020 मध्ये करिना कपूरचा बोलबोला, आपल्या सौंदर्याने जिंकले सर्वांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 3:33 PM

Lakme Fashion Week 2020 : लॅक्मे फॅशन वीकला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.गेल्या 11 वर्षापासून करिना यात सहभागी होते.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके असते. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री करिना कपूर खानचा पुन्हा एकदा याच गोष्टीची प्रचिती आली जेव्हा ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करत सा-यांच्या समोर आली. तिला पाहताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.  या ड्रेसमध्ये करिनाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच होत्या.

आपल्या आपल्या बोल्ड स्टाईलने तिने यावेळीही सर्वांची मन जिंकली.तिच्या हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. त्यामुळे स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे.   ब्राइट ग्रीन गाउनमध्ये ती अधिक सुंदर दिसत होती. अमित अग्रवालने तिचा हा गाउन डिझाइन केला होता. लॅक्मे फॅशन वीकला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.गेल्या 11 वर्षापासून करिना यात सहभागी होते. 

करिनासह बिपाशा बसु, मलाइका अरोरा, दीया मिर्जा, तब्बू, दिव्या खोसला कुमार, सारा अली खान अशा अनेक अभिनेत्रींनी या फॅशन वीकमध्ये आपला सहभाग नोंदवला. 

टॅग्स :करिना कपूरलॅक्मे फॅशन वीक