Join us

करीनाने रिक्रिएट केलं माधुरीचं 'चोली के पीछे क्या है'; तुम्हाला कोणतं गाणं वाटतंय बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:36 IST

'खलनायक' या सिनेमातील 'चोली के पिछे क्या हैं' हे माधुरीचं गाणं २०२४ मध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे.

31 वर्षांपूर्वी रिलीज झालेला 'खलनायक' हा सिनेमा साऱ्यांनाच ठावूक आहे. या सिनेमातीलमाधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलेलं 'चोली के पिछे क्या हैं'  हे गाणं तुफान गाजलं होतं. अल्का याज्ञिक आणि इला अरुण यांच्या आवाजातील हे गाणं आजही प्रेक्षक तितक्याच उत्साहात एन्जॉय करतात. विशेष म्हणजे माधुरीचं हे गाणं २०२४ मध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. परंतु, या नव्या गाण्यात माधुरीऐवजी माधुरी करीना कपूर झळकली असून नुकतंच हे गाणं रिलीज झालं आहे.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेला क्रू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात 'चोली के पिछे क्या हैं' हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 'चोली' हे गाणं नव्या अंदाजात सादर केल्यामुळे त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

नव्या अंदाजातील हे गाणं अक्षय आणि आयपीने रिक्रिएट केलं आहे. तर, दिलजीत दोसांझ, आयपी सिंह, अल्का याज्ञिक आणि इला अरुण यांनी ते पुन्हा गायलं आहे. या नव्या गाण्याचे रिलिक्स आयपी सिंह यांनीच लिहिले आहेत.

दरम्यान, क्रूमधील हे गाणं खासकरुन करीना कपूरवर चित्रीत करण्यात आलं असून अनेक जण आता तिची आणि माधुरीची तुलना करत आहेत. या दोघींपैकी कोणाचा डान्स चांगला आहे यावर नेटकरी चर्चा करत आहेत. क्रू हा सिनेमा येत्या २९ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात करीना व्यतिरिक्त कृती सेनॉन, दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा आणि तब्बू हे कलाकार झळकले आहेत.

टॅग्स :बॉलिवूडकरिना कपूरमाधुरी दिक्षितसिनेमा