Join us

'काय माहित तुझा आवाज चांगला आहे की नाही' करीना कपूरने आलियाच्या आवाजाची उडवली खिल्ली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:26 IST

नणंद-भावजयीचं मजेशीर संभाषण

आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. सोबतच तिला गायलाही आवडतं. तिने 'हायवे' सिनेमात 'इक कुडी' हे गाणं गायलं होतं. तसंच 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' मध्ये 'समझावाँ' गाणं गायलं. आलियाच्या आवाजाचंही खूप कौतुक झालं. नुकतंच तिने नणंद आणि अभिनेत्री करीना कपूरच्या (Kareena Kapoor) टॉक शोमध्ये हजेरी लावली. यामध्ये करीनाने आलियाच्या आवाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचं हे संभाषण व्हायरल होतंय.

करीना कपूरचा टॉक शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' मध्ये नुकतीच आलिया भटने हजेरी लावली. याता प्रोमो रिलीज झाला आहे. यात आलिया म्हणते, 'मला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे.' तर करीना गमतीत म्हणते, 'मला नाही माहित की तुझा आवाज खरंच चांगला आहे की नाही.' यानंतर आलिया लगेच म्हणते की मी बाथरुममध्ये गाऊ शकते.

आलिया आणि करीना कपूरचं हे मजेशीर संभाषण आणि हा टॉक शो पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. आलिया आगामी 'जिगरा' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा तिने स्वत: निर्मितही केला आहे. भावा बहिणीच्या नात्यावर आणि भावाची परदेशातील तुरुंगातून सुटका करण्यासाठी बहीण कोणत्या थराला जाऊ शकते याची ही कहाणी आहे. वैदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका केली आहे. तर करीना कपूर आगामी 'सिंघम अगेन' सिनेमात झळकणार आहे. 

 

टॅग्स :आलिया भटकरिना कपूरबॉलिवूड