Join us

'कुर्बान' मध्ये सैफ अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर करिना कपूर म्हणाली, 'आम्ही आधीपासूनच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:46 IST

तब्बल १४ वर्षांनी करीनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) ही सर्वात हॉट जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांमधील रोमान्स 2009 साली आलेल्या 'कुर्बान' सिनेमात पाहायला मिळाला होता. यातील त्यांच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. दोघांची सिझलिंग केमिस्ट्री बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होती. तब्बल १४ वर्षांनी करीनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फिल्म क्रिटिक राजीव मसंदच्या अॅक्टर्स राऊंडटेबलमध्ये काजोल, अमृता सुभाष, जयदीप अहलावत, करीना कपूर, सान्या मल्होत्रा, तिलोत्तमा शोम, सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी सिद्धार्थने करीनाला कुर्बानमधील सेक्स सीनवर प्रश्न विचारला. यावर करीना म्हणाली,'आम्ही आधीपासूनच एकमेकांना डेट करत होतो. आम्ही ऑडिशनही दिली होती जी चांगली झाली. आम्हाला काहीच अडचण नव्हती.' करीनाच्या या उत्तरावर काजोलने तिची चेष्टा केली. ती म्हणाली,'ते तर त्यांची प्रायव्हेट ऑडिशन होती.' काजोलच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकतो. 

करीना पुढे म्हणाली,'आम्ही ५ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो. त्यात आम्ही खूश होतो. पण आम्हाला मुलंही हवी होती म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. डर्टी मॅगझीनशी बोलताना करीना म्हणाली होती की,'तुम्ही फक्त मुलांसाठी लग्न करता. नाहीतर तुम्ही लिव्हइन मध्ये राहूच शकता. सैफ आणि मी केवळ मूलं हवीत म्हणून लग्नाची स्टेप घेतली.'

करीनाने नुकतंच 'जाने जान' सिनेमातून ओटीटी माध्यमात पदार्पण केले. यामध्ये तिने जयदीप अहलावत आणि विजय वर्माही यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. याशिवाय करीनाचा 'बकिंगहम मर्डर्स' हा सिनेमा रिलीज झाला आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टरिलेशनशिपबॉलिवूड