करीना कपूर करतेय कमबॅकची तयारी, हेअर कलर करत केला लूक चेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:56 PM2021-03-10T20:56:37+5:302021-03-10T20:57:35+5:30
करीना कपूरने नवीन लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो पाहून ती लवकरच कमबॅक करण्याच्या तयारीत दिसते आहे.
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यानंतर काही दिवस उलटले असताना आता ती कमबॅक करण्याच्या तयारीला लागली आहे. तिच्या प्रेग्नेंसीला एक महिनादेखील उलटलेला नाही आणि ती स्वतःचा मेकओव्हर करताना दिसते आहे. नुकतेच करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सलूनमध्ये बसलेली दिसते आहे. यासोबत तिने एक पोस्टदेखील शेअर केली आहे.
करीना कपूरने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि ढगळे कपडे आणि डायपर्ससाठी तयार आहे. यासोबत तिने या पोस्टमध्ये तिचा हेअर ड्रेसरचे आभार मानले आहेत. तर तिने इंस्टाग्राम स्टोरीवर म्हटले की, तिचे हेअर ड्रेसर आज त्यांच्या कामाला लागले आहेत. यासोबतच ती लोकांना विचारते आहे की तुम्ही सांगा मी कोणता हेअरकलर करणार आहे. यासोबतच चाहत्यांना तिने दोन पर्यायही दिले आहे. तिने Balayage कलर केला आहे.
असे म्हटले जात आहे की करीना लवकरच चित्रपटात कमबॅक करू शकते. नुकतीच करीना सैफसोबत फिरताना दिसली होती. आज समोर आलेल्या फोटोत ती सुंदर दिसते आहे. लवकरच ती तिच्या शेप मध्ये येणार आहे. करीनाचा हा फोटो चाहत्यांना खूप भावला आहे. तिच्या या फोटोवर खूप कमेंट्स होत आहेत.
करीना कपूर प्रेग्नेंसीच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होती. तिने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. या बाळाच्या नावाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने प्रेग्नेंसीच्या आधी आमिर खान सोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. लवकरच तिचा हा चित्रपट रिलीज होणार आहे.