बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यानंतर काही दिवस उलटले असताना आता ती कमबॅक करण्याच्या तयारीला लागली आहे. तिच्या प्रेग्नेंसीला एक महिनादेखील उलटलेला नाही आणि ती स्वतःचा मेकओव्हर करताना दिसते आहे. नुकतेच करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सलूनमध्ये बसलेली दिसते आहे. यासोबत तिने एक पोस्टदेखील शेअर केली आहे.
करीना कपूरने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि ढगळे कपडे आणि डायपर्ससाठी तयार आहे. यासोबत तिने या पोस्टमध्ये तिचा हेअर ड्रेसरचे आभार मानले आहेत. तर तिने इंस्टाग्राम स्टोरीवर म्हटले की, तिचे हेअर ड्रेसर आज त्यांच्या कामाला लागले आहेत. यासोबतच ती लोकांना विचारते आहे की तुम्ही सांगा मी कोणता हेअरकलर करणार आहे. यासोबतच चाहत्यांना तिने दोन पर्यायही दिले आहे. तिने Balayage कलर केला आहे.