आमिर खानसाठी हे वर्ष फारसं चांगलं ठरलं नाही. त्याचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. सुमारे 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपला खर्चही वसूल करू शकला नाही. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा'च्या निर्मात्यांना सुमारे 100 कोटींचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. 'लाल सिंह चड्ढा'चं अपयश आमिर खानच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
यासिनेमात आमिर खानच्या या सिनेमात करिना कपूरही मुख्य भूमिकेत झळकली होती. लाल सिंग चड्ढाच्या अपयशावर पहिल्यांदाच अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच करीना कपूर म्हणाली की, 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर तिने आमिर खानला 'माफी मागताना' खूप खचलेला पाहिलं. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) कार्यक्रमात ती आमिर खानला भेटली. पुढे म्हणाली की, तिने आमिर खानला सांगितले की, बॉक्स ऑफिसवर त्यांचा चित्रपट यशस्वी आहे की अयशस्वी आहे यानुसार ती कोणत्याही नातं, मैत्री किंवा अभिनेत्याला जज करत नाही.
करीना कपूर पुढे म्हणाली, 'मी त्याला व्हॉट्सअॅपवर सांगितले होते की, तू असं समजू नकोस की आपण हरलोय. आपण एक सुंदर चित्रपट बनवला आहे आणि आपली मैत्री आणि आपल्यातं स्नेह हे बॉक्स ऑफिसवरील यशावर अवलंबून नाही.
करीना कपूर म्हणाली की, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील भूमिका आमिर खानने पूर्णपणे जीवंत केली होती.कोविडमुळे या चित्रपटाच्या कामगिरीवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.