Join us  

करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:40 AM

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती. 

अभिनेत्री करीना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) मध्य प्रदेश हायकोर्टाची नोटीस मिळाली आहे. तिच्या प्रेग्नंसीवरील पुस्तकाच्या नावावरुन झालेल्या वादामुळे तिला ही नोटीस मिळाली. ज्याचं काल तिने उत्तर दिलं. तसंच याप्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती. 

करीना कपूरने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीवेळी पुस्तक लिहिलं होतं. याचं नाव तिने 'प्रेग्नंसी बायबल' असं दिलं होतं. नावात बायबल लिहिल्याने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. पुस्तकाची विक्री थांबवण्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेला करीनाने उत्तर दिलं. आमचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता असं तिने उत्तरात नमूद केलं. आता याप्रकरणी पुन्हा पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. क्रिस्टोफर एंथनी यांनी करीनाच्या 'प्रेग्नंसी बायबल' विरोधात ही याचिका दाखल केली होती.  

करीना कपूर नुकतीच 'क्रू' सिनेमात दिसली होती. याशिवाय तिचा 'द बर्किंगघम मर्डर्स' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हंसल मेहता यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 13 सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. तसंच करीना रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' मध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरप्रेग्नंसीउच्च न्यायालयमध्य प्रदेशबॉलिवूड