हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज धर्मेंद्र यांचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ बॉबी देओल( Bobby Deol)ने अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत जन्मलेले ते आता 54 वर्षांचा आहे. 'बरसात' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बॉबी देओलने 'शोलजार', 'गुप्त: द हिडन ट्रुथ', 'दिल्लगी', 'हमराज', 'बादल', 'विच्छू', 'क्रांती' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. '. चित्रपटांसोबतच त्यांनी आता ओटीटीच्या जगातही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉबी देओलला त्याच्या वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉलीवूडमध्ये चांगले नाव कमावले असूनही आणि फिल्मी कुटुंबातील असूनही एक काळ असा होता की बॉबी देओलकडे काम नव्हते. त्याला अनेक चित्रपटांमधूनही रिप्लेस करण्यात आलं होते. यापैकी एक चित्रपट म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूरचा चित्रपट 'जब वी मेट', ज्याची निर्मिती चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांनी केली होती .या चित्रपटात करीना कपूर-शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका होती. करिनाने गीतची भूमिका साकारली असून शाहिद कपूरने आदित्य कश्यपची भूमिका साकारली आहे. यापूर्वी शाहिदच्या भूमिकेत बॉबी देओल आदित्यची भूमिका साकारणार होता पण करिनाने शाहिदला पसंती दिली.
जब वी मेट सिनेमासाठी बॉबी देओल पहिली पसंत होता, याचा खुलासा स्वत: बॉबीने केला होता. रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान बॉबी देओल म्हणाला, माझी जागीनंतर सिनेमात शाहिदची वर्णी लागली. इम्तियाज अलीने मला 'जब वी मेट'मधील भूमिका ऑफर केली होती, मी पण लगेच होकार दिला होता.
आधी मेकर्सनी बॉबी देओच्या नावाला पसंती दिली होती. शाहिद कपूरची एन्ट्री ब-याच उशीरा झाली. ते सुद्धा करिना कपूरच्या हट्टापायी. करिनाच्या हट्टापायी बॉबी या चित्रपटातून बाद झाला अन् त्याच्या जागी शाहिद कपूरची वर्णी लागली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे या चित्रपटासाठी तो कोणतीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नव्हता. या चित्रपटासाठी त्याने बॉबी देओलची निवड केली होती. बॉबीची निवड केल्यानंतर इम्तियाजने चित्रपटाच्या निर्मितीसाठी अष्टविनायक प्रॉडक्शनची भेट घेतली. परंतु अष्टविनायक प्रॉडक्शन या चित्रपटात करिना कपूर हवी होती
करिनाच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता. ना इम्तियाजचा, ना बॉबीचा. दोघांनीही तिच्या नावाला होकार दिला. त्यानुसार, करिनाशी संपर्क केला गेला. पण करिना म्हटल्यावर ती सहज कशी मानणार? तिनेही अट ठेवली. होय, शाहिद कपूर हिरो असेल तरच मी हा चित्रपट करणार, ही तिची अट होती. असे का याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. याचे कारण म्हणजे, करिना त्यावेळी शाहिदला डेट करत होती. म्हणून तिला शाहिद हवा होता.तिच्या या अटीने सगळ्यांचीच गोची झाली. अखेर इम्तियाजला करिनाची ही अट मान्य करावी लागली. मग काय, बॉबी देओलचा पत्ता आपोआट कट झाला.