Join us

करिना कपूरचा खुलासा; मुलाचे नाव तैमूर नव्हे तर ‘हे’ ठेवणार होतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 9:13 AM

अभिनेत्री करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर आता १४ महिन्यांचा झाला आहे. तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे ...

अभिनेत्री करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर आता १४ महिन्यांचा झाला आहे. तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. असो, आता मम्मी करिनाने या नावाबद्दल एक खुलासा केला आहे. तिने म्हटले की, आम्ही सुरुवातीला तैमूरचे नाव फैज ठेवणार होतो. करिनाने हा खुलासा इंडिया टुडे कॉनक्लेव दरम्यान केला. ज्यामध्ये ती बहीण करिश्मा कपूरसोबत शनिवारी सहभागी झाली होती. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना करिनाला विचारण्यात आले की, माध्यमांच्या लुडबुडमुळे तुमचे व्यक्तिगत आयुष्य प्रभावित होत आहे काय? विशेषत: तुझ्या मुलाच्या नावावरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे?याचे उत्तर देताना करिनाने म्हटले की, होय, तैमूर नावावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू होती. परंतु याचदरम्यान बरेचसे असे लोक होते जे आमच्या समर्थनार्थ पुढे आले होते. त्यामुळे हे ट्रोलर्स आमच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाहीत. तैमूरच्या नावाबद्दल खुलासा करताना करिनाने म्हटले की, ‘ज्या दिवशी मी डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती त्याच दिवशी मी सैफबरोबर याविषयी बोलली होती. तेव्हा त्याने मला ‘फैज’ हे नाव सुचविले. त्याने मला म्हटले की, बेबो, फैज हे नाव खूपच काव्यात्मक आणि खूपच रोमानी वाटते. तेव्हा मी त्याला म्हटले की, तैमूरचा अर्थ पोलाद होतो. जर मी एका मुलाला जन्म देत आहे तर माझा मुलगा एक योद्धा असावा. त्यामुळेच आम्ही तैमूर या नावावर शिक्कामोर्तब केला. यावेळी करिनाला असेही विचारण्यात आले की, तुझ्या मुलाला मीडियामध्ये मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे तू आनंदी आहेस काय? तेव्हा करिनाने म्हटले की, नाही, हे मला अजिबात आवडत नाही की, तैमूरच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष दिले जावे. विशेष म्हणजे लोक त्याच्या हेअरस्टाइलपासून अन्य गोष्टींवरही चर्चा करीत आहेत. मला असे म्हणायचे की, तो आता केवळ १४ महिन्यांचा आहे. पण मला कळत नाही की, ही चर्चा मी कशी थांबवू? आता तर मला असे वाटत आहे की, त्याला आता कॅमेºयाची चांगलीच ओळख झाली आहे. त्यामुळे तो आता न घाबरता कॅमेºयाकडे बघत असतो.