Join us

बेबो करीना कपूरने लग्नापूर्वी सैफ अली खानला घातली होती ही अट, वाचून तुम्हीही व्हाल कराल तिचं कौतूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:07 PM

एका मुलाखती दरम्यान करिनाने स्वत: हा खुलासा केला.

करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या दोघांचं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण सैफशी लग्न करण्यासाठी करिनाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. 

'टशन' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करीनानं सांगितले की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिनं मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करीना कपूर असं काही करतेय, यावर माझा विश्वास बसत नाही, असे सैफनं म्हटले होते.'' शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफनं लग्नासाठी प्रपोज केल्याचं करीनानं सांगितलं.

एका मुलाखतीदरम्यान करीनानं आपल्या लग्नाची गोष्ट सविस्तरपणे मांडली. पुढे करिना म्हणाली, याबाबत करीनाने सांगितले की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफनं मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफलाही या गोष्टीपासून काही प्रोब्लेम नव्हता. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना लवकरच 'अंग्रेजी मीडियम'मध्ये  दिसणार आहे. करिना कपूर यात एक महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी अशी भूमिका कधी साकारलेली नाही. पहिल्यांदा करीना आणि इरफान एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधी करिना वीरे दी वेडींग सिनेमात दिसली होती. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान