Join us

GOOD NEWS!! तैमूरला भाऊ झाला; सैफ अली खान व करिना कपूरला पुत्ररत्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 11:10 IST

Kareena-Saif Welcome Baby Boy: करिना कपूरने आज गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देकरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे.

तैमूर अली खानला भाऊ झाला आहे. होय, सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2016 मध्ये करिना व  सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता. गत ऑगस्टमध्ये दुस-यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने शेअर केली होती.

आई व बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे कळतेय. दरम्यान दुस-या बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. करिना व सैफवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ नव्या अलिशान घरात शिफ्ट झाले आहेत. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जंगी स्वागत होणार आहे.  करिनाच्या डिलिव्हरी अगोदर सैफ अली खान आपले काम पूर्ण करून घेत आहे.

2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. दुस-या प्रेग्नंसीदरम्यानही करिना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत काम करत होती.    

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे तिच्या वाट्याचे शूटींग बेबोने कधीच पूर्ण केले आहे. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर