Join us

"Legends!" 12th Fail पाहून करीनाही भारावली, विक्रांत मेसीसाठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 5:59 PM

बॉलिवूडच्या बेबोने 12th Failसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th Fail सिनेमाची जिकडेतिकडे चर्चा आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या विक्रांत मेसीचं सर्वत्र कौतुक होत आहे. १२वीत नापास होऊनही स्पर्धा परिक्षांचं ध्येय ठेवून यश मिळवणाऱ्या IPS मनोज कुमार शर्मा यांची प्रेरणादायी कथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमासाठी पोस्ट शेअर केल्या होत्या. आता बॉलिवूडच्या बेबोने 12th Failसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर 12th Fail हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा पाहिल्यानंतर करीना भारावून गेली आहे. करीनाने याबाबत इन्स्टावर पोस्ट शेअर करत 12th Failच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. "12th Fail विधु विनोद चोप्रा, विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमन पुष्कर आणि संपूर्ण टीम 'लिजेंड'" असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

करीनाने केलेलं कौतुक पाहून विक्रांत मेस्सीही थक्क झाला आहे. त्याने करीनाची ही पोस्ट शेअर करत करीनाचे आभार मानले आहेत. "आता मी निवृत्ती घेऊ शकतो. थॅक्यू यू मॅम! हे माझ्यासाठी काय आहे, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 12th Fail सिनेमात विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अंशुमन पुष्कर, अनंत जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. 

टॅग्स :करिना कपूरविक्रांत मेसीसिनेमा