Join us

सोहाशिवाय सैफला आहे आणखी एक सख्खी बहीण; संपत्तीच्या बाबतीत आहे तोडीस तोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 19:48 IST

Saba Pataudi: शर्मिला टागोर यांनी सैफ, सोहा आणि सबा ही तीन मुलं आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य कलाविश्वात सक्रीय आहेत. त्यामुळे ते या ना त्या कारणामुळे सतत लाइमलाइटमध्ये येत असतात. परंतु, त्याच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती आहे ती बॉलिवूडच्या झगमगाटापासून कायम दूर असते. ती म्हणजे सैफची सख्खी लहान बहीण. सोहा अली खानविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तिच्याव्यतिरिक्त सैफला आणखी एक सख्खी बहीण आहे हे फार मोजक्या लोकांना माहित आहे. त्यामुळेच आज तिच्याविषय़ी जाणून घेऊयात.

सैफची धाकटी बहीण सोहा अली खान सगळ्यांना माहित आहे. मात्र,आज सबा अली खानविषयी (Saba Ali Khan) जाणून घेऊयात. शर्मिला टागोर यांनी सैफ, सोहा आणि सबा ही तीन मुलं आहेत. यात सैफ आणि सोहा कलाविश्वात सक्रीय आहेत. तर, सबा मात्र,एक ज्वेलरी डिझायनर आहे. 

सबा, सैफपेक्षा ५ वर्षांनी लहान असून तिला बॉलिवूड पार्टींजमध्ये जायला फारसं आवडत नाही. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे. ती इन्स्टाग्रामवर कायम आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. सबा प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर असून तिने अलिकडेच एक डायमंड चेन सुरु केली आहे. त्यामुळे ती ज्वेलरी क्षेत्रातच तिचं करिअर घडवत आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्रात न येण्यामागचं कारण सांगितलं.

४३ वर्षाच्या सबाने अद्यापही लग्न केलं नसून तिच्या एकटीकडे तब्बल 2700 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसंत पटौदी खानदानच्या संपूर्ण संपत्तीचा हिशोबदेखील तिच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. सबाची औकाफ-ए-शाही या नावाची संस्था आहे. या संस्थेचा सगळा भारही ती एकटीच सांभाळते. 

टॅग्स :सैफ अली खान सोहा अली खानकरिना कपूरसेलिब्रिटीसिनेमाशर्मिला टागोर