Join us

‘रिफ्युजी’मध्ये अभिषेक बच्चनसोबत रोमॅन्टिक सीन करण्यास करिना कपूर नव्हती तयार, हे होते कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:32 PM

अभिषेक बच्चन व करिना कपूर स्टारर ‘रिफ्युजी’ हा चित्रपट रिलीज होऊन १९ वर्षे पूर्ण झालीत. या चित्रपटाबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

ठळक मुद्देसर्वप्रथम राकेश रोशन यांनी करिनाला ‘कहो ना प्यार है’ची ऑफर दिली होती. करिनाने हा चित्रपट साईनही केला होता. पण ऐनवेळी तिने हा चित्रपट सोडला

अभिषेक बच्चनकरिना कपूर स्टारर ‘रिफ्युजी’ हा चित्रपट रिलीज होऊन १९ वर्षे पूर्ण झालीत. सन २००० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अभिषेक व करिनाचा पहिला चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण त्या वर्षांतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतपत गल्ला या चित्रपटाने जमवला होता. या चित्रपटाबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

होय, या चित्रपटात अभिषेकसोबत रोमॅन्टिक सीन देताना करिना कपूर कमालीची नर्वस होती. चित्रपटातील पहिला सीन हाच रोमॅन्टिक होता. पण करिना काही केल्या हा सीन करण्यास राजी नव्हती. कारण अभिषेक बच्चन हा करिनासाठी भावासारखा होता.

‘जेपी अंकल मी अभिषेकसोबत रोमॅन्टिक सीन कसा करू शकते. तो माझ्या भावासारखा आहे,’ असे करिना दिग्दर्शक जेपी दत्ता यांना म्हणाली होती.अभिषेकने स्वत: एका टॉक शोमध्ये याचा खुलासा केला होता. शूटींगच्या पहिल्या दिवशी सेटवरचा करिनाचा आत्मविश्वास कमालीचा होता, असेही त्याने म्हटले होते. ‘एकदिवस मी देशाची नंबर वन स्टार असेल, असे करिना पहिल्याच दिवशी मला म्हणाली होती. तिचा तो आत्मविश्वास बघून मी अवाक झालो होतो,’ असे अभिषेकने यावेळी सांगितले होते.

सर्वप्रथम राकेश रोशन यांनी करिनाला ‘कहो ना प्यार है’ची ऑफर दिली होती. करिनाने हा चित्रपट साईनही केला होता. पण ऐनवेळी तिने हा चित्रपट सोडला. याचदरम्यान जेपी दत्ता यांना ‘रिफ्युजी’साठी एका नव्या चेह-याचा शोध होता. जेपी यांनी पहिल्यांदा करिनाला पाहिले आणि त्यांना ती आपल्या चित्रपटासाठी परफेक्ट वाटली. त्यांनी लगेच तिला साईन केले. त्यावेळी करिना १९ वर्षांचा होता तर अभिषेक २४ वर्षांचा होता.

टॅग्स :करिना कपूरअभिषेक बच्चन