बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान प्रेग्नेंसीतही काम करताना दिसते आहे. प्रेग्नेंसीदरम्यान तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. नुकतेच करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले की प्रेग्नेंसीदरम्यान काम करणे अयोग्य नाही. तिने हेदेखील सांगितले की, तिच्या कुटुंबाने तिला घरी रहायला सांगितले आहे पण तरीदेखील तिला काम करणे गरजेचे वाटते कारण तिला तिचे कमिटमेंट्स पूर्ण करायचे होते.
करीना कपूर खानने कोरोनाच्या काळात काम करण्याबद्दल सांगितले की, सर्व सुरक्षेसोबत काम करणे चुकीचे नाही. प्रेग्नेंसी कोणता आजार नाही आणि मी ही गोष्ट मानते की कठीण काळात आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत काम करू शकत नाही, अशी कारणे देऊन मी गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी तशी नाही. हो, माझे पालक आणि इतर लोकांनी मला घरी रहायला सांगितले आहे पण मी घरी बसू शकत नाही. मला काम करायला आवडते.
करीना म्हणाली की, जेव्हा मी लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना नामक महारोगराई येईल. चित्रपटाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. प्रेग्नेंट झाल्यानंतर मी माझे सर्व कमिटमेंट्स पूर्ण केले.
करीनाने ट्रोलिंगबद्दल सांगितले की, मला वाटते की लॉकडाउन आणि कोविडमुळे लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वांकडे खूप वेळ आहे. त्यामुळे लोक जास्त चर्चा आणि टीका करत आहे. सर्व घरी बसले आहेत. कित्येक लोकांकडे नोकऱ्या नाहीत. सर्वांनी याकडे ट्रोलिंगसारखे पाहिले नाही पाहिजे. मला वाटते की सर्व घरी कंटाळले आहेत आणि त्यांना काहीतरी सांगायचे आहे.
करीना पुढे म्हणाली की, मला वाटते की आपण इथे शांती आणि पॉझिटिव्हीटी पसरवली पाहिजे. सर्वांनी आपल्या स्पेसमध्ये आनंदी राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांच्या गोष्टीत जास्त लुडबूड नाही केली पाहिजे. जर ट्रोलिंगमुळे कोणी आनंदी होत असेल तर होऊ दे.