प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अनंत आणि राधिकाचा प्री वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला. ३ दिवसांच्या या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडची बेबोही या सोहळ्यासाठी उपस्थित होती. या सोहळ्यातील करीनाच्या लूकची चर्चा होत आहे.
बॉलिवूडची बेबो अशी ओळख मिळवलेली करीना कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. अनंक अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये करीनाने तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्यात करीना कपूरने गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने खड्यांचा भरजरी नेकलेसही घातला होता. तिच्या या नेकलेसची सर्वत्र चर्चा आहे. करीनाने घातलेला हा नेकलेस तिच्या लग्नातील आहे. करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
Kareena rewear her Delhi reception jewelsbyu/Complete-Sweet5222 inBollyBlindsNGossip
"लग्नात यांना नवीन ज्वेलरी घ्यावी लागेल, म्हणून आता प्रीवेडिंगला जुनेच दागिने घालत आहेत," अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने "आताच्या आउटफिटला ज्वेलरी जास्त चांगली वाटत आहे" असं म्हटलं आहे. "आता ही ज्वेलरी जास्त चांगली दिसत आहे," असंही एकाने म्हटलं आहे.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्याला करीना पती सैफ अली खान आणि मुलं तैमुर-जेहसह उपस्थित होती. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. आता प्री वेडिंगनंतर जुलै महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार आहेत.