करिना कपूरची ‘वापसी’ लांबली ! ‘वीरे दी वेडिंग’ने घेतला हॉलिवूडपटाचा धसका!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 9:39 AM
‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट दीर्घ काळापासून चर्चेत आहे. हा सोनम कपूरच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा आहे, म्हणून नव्हे तर ...
‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट दीर्घ काळापासून चर्चेत आहे. हा सोनम कपूरच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा आहे, म्हणून नव्हे तर या चित्रपटाद्वारे करिना कपूर ‘वापसी’ करणार आहे, म्हणून या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामुळे करिनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट खरे तर १८ मे रोजी रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. होय, आता हा चित्रपट १८ मे नाही तर १ जून रोजी रिलीज होणार आहे. आता चित्रपट लांबणीवर टाकण्यामागचे कारण काय? तर एक हॉलिवूड चित्रपट. होय, १८ मे रोजी रायन रेनॉल्ड स्टारर ‘डेडपूल2’ हा हॉलिवूडपट रिलीज होतो आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले. यात बुलेट्सचा पाऊस पडताना दिसतोय. याच चित्रपटाला घाबरून ‘वीरे दी वेडिंग’च्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. अलीकडच्या काळात भारतीय बॉक्सआॅफिसवर हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे ‘वीरे दी वेडिंग’चे मेकर्स कुठलीही रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे शशांक घोष दिग्दर्शित हा चित्रपट आता १ जूनला रिलीज होईल. यात करिनासोबत रोमांस करताना सुमीत व्यास दिसणार आहे. ALSO READ : अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत कापला गेला ‘ADULT’ केक! संतापले लोक!!हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. (एकता कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे.)रिया पहिल्यांदा करिनाकडे या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेली. तेव्हा करिनाने या चित्रपटाला नकार दिला होता. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द करिनाने हा किस्सा सांगितला होता. कारण रिया हा चित्रपट घेऊन आली तेव्हा करिना प्रेग्नंट होती. पण रियाला करिनाच हवी होती. तिने करिनाच्या प्रसूतीपर्यंत प्रतीक्षा केली. करिनाने मुलाला जन्म दिल्यानंतर सहा- आठ महिन्यांनी या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले होते.