Join us  

करीना कपूरच्या 'द बकिंघम मर्डर्स'चे नवीन पोस्टर रिलीज, या अंदाजात दिसतेय बेबो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 6:20 PM

The Buckingham Murders : करीना कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स'चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर प्रदर्शित होताच या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

करीना कपूर(Kareena Kapoor)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स'(The Buckingham Murders)चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर प्रदर्शित होताच या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात करीना कपूर खान अशा भूमिकेत आहे जी तुम्हाला तुमच्या सीटवर खिळवून ठेवण्यास भाग पाडेल.

 'द बकिंघम मर्डर्स'च्या नवीन पोस्टरवर रहस्य आणि उत्साह दोन्ही आहे. या नव्या चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाणारी करीना कपूर खान यावेळीही सर्वांना प्रभावित करण्यासाठी सज्ज आहे. हंसल मेहता दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित हा चित्रपट मिस्टर जॉनरमध्ये एक उत्कृष्ट जोड असणार आहे.

द बकिंघम मर्डर्स १३ सप्टेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, ऍश टंडन, रणवीर ब्रार आणि किथ ऍलन यांच्यासोबत उत्कृष्ट कलाकार आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित आणि असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर लिखित, हा चित्रपट महाना फिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स निर्मित आहे, बालाजी टेलिफिल्म्स प्रस्तुत आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांची निर्मिती आहे. याआधी करीना कपूर 'क्रू' चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तब्बू आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होत्या.

टॅग्स :करिना कपूर