१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाला आज २४ वर्ष पूर्ण झाली. या युद्धात भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय मिळवला. तेव्हापासून हा दिवस कारगिल शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात अनेक जवानांना वीरमरण आलं. कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी अवघ्या २४व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो, तेव्हा विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची आठवण काढली जाते.
विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा 'शेरशाह' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली होती. २०२१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन बत्रा यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री कियारा अडवाणी विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चिमा यांच्या भूमिकेत होती. विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राला प्रेक्षकांनी पसंत केलं होतं.
पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेला मराठी अभिनेता, म्हणाला, “ऑपरेशन झालेली माझी आई...”
सिद्धार्थ मल्होत्रा आधी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसला होता. कारगिल युद्धावर आधारित ‘एलओसी : कारगिल’(LOC : Kargil) हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चनने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. तर विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत ईशा देओल होती.
ना सुपरहिरो ना बिग बजेट, तरीही ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाने ११ दिवसांत कमावले ७० कोटी
‘एलओसी : कारगिल’ या अभिषेक बच्चनसह चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, करिना कपूर, राणी मुखर्जी सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, रवीना टंडन या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.