Join us

करिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:08 IST

करिश्मा कपूरने आपला पहिला नवरा संजय कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर ती नेहमी बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत दिसायची.यावर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होत्या,

ठळक मुद्देसंजय आणि करिश्माचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेएकता कपूर निर्मित वेबसीरिजमध्ये करिश्माची वर्णी लागली आहे

करिश्मा कपूरने आपला पहिला नवरा संजय कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर ती नेहमी बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत दिसायची. यावर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र करिश्माचे वडील रणधीर कपूरने यांनी या गोष्टी नाकारल्या.     

आता संजय आणि करिश्माचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार करिश्माला दुसरं लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तिला आपल्या मुलांना वेळ द्यायचा आहे.  

 करिश्माने 2003 साली संजय कपूरशी लग्न केले होते मात्र हे लग्न जास्त दिवस टिकले नाही दोन वर्षातच त्यांचे रस्ते वेगळे झाले. संदीप हा एका औषधाच्या कंपनीचा सीईओ आहे.  त्यांने सुद्धा आपल्या पत्नीपासून 2017 ला घटस्फोट घेतला आहे. यानंतर असा अंदाज बांधण्यात येत होता की, करिश्मा संदीपसोबत लग्न करेल. मात्र नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार करिश्माला सिंगल राहायचे आहे.  

एकता कपूर निर्मित वेबसीरिजमध्ये करिश्माची वर्णी लागली आहे. पण या वेबसीरिजच्या मार्गात एक अडचण उभी ठाकली आहे. या ‘अडचणी’चे नाव आहे, भाईजान. होय, एकता कपूरने या वेबसीरिजसाठी ‘मेंटल हुड’ हे नाव ठरवले आहे. पण इथेच खरी अडचण आली आहे. कारण ‘मेंटल’ हे टायटल काही क्रमबदल व शब्दसंयोजनासह सलमान खानच्या एसकेएफ या प्रॉडक्शन हाऊसने आधीच रजिस्टर केले आहे. ‘जय हो’ या चित्रपटासाठी आधी ‘मेंटल’ हे नाव रजिस्टर करण्यात आले होते. त्यामुळे एकताला आपल्या वेबसीरिजसाठी ‘मेंटल हुड’ हे टायटल मिळणे कठीण आहे.

टॅग्स :करिश्मा कपूर