Join us

अजय देवगणला माझ्यात इंटरेस्ट असेल तर... असे का म्हणाली होती करिश्मा कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:46 PM

एकेकाळी करिश्मा आणि अजय यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. एवढेच नव्हे तर ते लग्न करणार असे देखील म्हटले जात होते.

ठळक मुद्देमी आणि अजय दोघे केवळ फ्रेंड्स असून आमच्यात असे काहीही नाहीये. त्याला माझ्याबाबत अशा काही भावना वाटतात का हे मला माहीत नाही... कारण त्याने मला याबाबत काहीच सांगितलेले नाहीये. पण हे असे काहीच नाहीये याची मला खात्री आहे.

करिश्मा कपूर आणि अजय देवगण हे दोघेही आपापल्या आयुष्यात चांगलेच सेटल झाले आहेत. अजय देवगणचे लग्न कित्येक वर्षांपूर्वी अभिनेत्री काजोल सोबत झाले. त्यांना युग आणि निसा अशी दोन मुले आहेत तर करिश्मा कपूरचे लग्न बिझनेसमन संजय कपूरसोबत झाले होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या मुलांचा सांभाळ आता करिश्मा करत आहे. एकेकाळी करिश्मा आणि अजय यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. एवढेच नव्हे तर ते लग्न करणार असे देखील म्हटले जात होते.

अजयने काजोलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे देखील करिश्माला आवडले नव्हते असे देखील म्हटले जाते. अजय आणि करिश्माचे कधीच अफेअर नव्हते. याबाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात होत्या असे करिश्माने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते. 1993 ला स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत करिश्माने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. 

करिश्माने या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्यावर विश्वास ठेवा... मी आणि अजय दोघे केवळ फ्रेंड्स असून आमच्यात असे काहीही नाहीये. त्याला माझ्याबाबत अशा काही भावना वाटतात का हे मला माहीत नाही... कारण त्याने मला याबाबत काहीच सांगितलेले नाहीये. पण हे असे काहीच नाहीये याची मला खात्री आहे. लोक काहीही विचार न करता थेट कन्क्ल्युजनवर पोहोचतात. आम्ही केवळ एकत्र चित्रपट साईन करत आहोत याचा अर्थ आमच्यात अफेअर आहे असे होत नाही. एवढेच नाही तर मी आणि अजय लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण मी अजून खूप लहान असून इतक्या लहान वयात मी लग्न करू शकते असा लोक विचार देखील कसे करतात.

अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांनी संग्राम, जिगर, सुहाग, धनवान, अजय यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे. 

टॅग्स :अजय देवगणकरिश्मा कपूर