Join us

‘मेंटल’साठी करिश्मा कपूरचा खटाटोप; सलमान खान करणार का मदत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 11:46 AM

एकता कपूर निर्मित वेबसीरिजमध्ये करिश्माची वर्णी लागली आहे. पण या वेबसीरिजच्या मार्गात एक अडचण उभी ठाकली आहे. 

करिना कपूरची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर लवकरच अभिनयाच्या दुनियेत परततेय, ही बातमी तुम्हाला कळली आहेच. एकता कपूर निर्मित वेबसीरिजमध्ये करिश्माची वर्णी लागली आहे. पण या वेबसीरिजच्या मार्गात एक अडचण उभी ठाकली आहे. या ‘अडचणी’चे नाव आहे, भाईजान. होय, एकता कपूरने या वेबसीरिजसाठी ‘मेंटल हुड’ हे नाव ठरवले आहे. पण इथेच खरी अडचण आली आहे. कारण ‘मेंटल’ हे टायटल काही क्रमबदल व शब्दसंयोजनासह सलमान खानच्या एसकेएफ या प्रॉडक्शन हाऊसने आधीच रजिस्टर केले आहे. ‘जय हो’ या चित्रपटासाठी आधी ‘मेंटल’ हे नाव रजिस्टर करण्यात आले होते. त्यामुळे एकताला आपल्या वेबसीरिजसाठी ‘मेंटल हुड’ हे टायटल मिळणे कठीण आहे.

आता एकताने एक फोन करून सलमानला गळ घातली तर काम फत्ते झाले असते, असा विचार तुम्हीही कराल. पण हे इतके सोपे नाही़ सलमान यासाठी तयार होईल की नाही, याची स्वत: एकताही खात्री नाही. पण तिच्याजवळ एक उपाय मात्र नक्की आहे, होय, करिश्मा कपूर. सूत्रांच्या मते, करिश्माचे सलमानसोबत चांगले संबंध आहेत. करिश्मा व करिनासोबत सलमानने बऱ्याच चित्रपटांत काम केले आहे. दोघीही सलमानच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे करिश्मा व करिनाच्या माध्यमातून हा गुंता सुटेल, अशी आशा एकताला आहे. 

टॅग्स :करिश्मा कपूरसलमान खान