बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाची कायमच चर्चा असते. यात खासकरुन कपूर सिस्टर अर्थात करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांची वरचेवर चर्चा रंगतांना पाहायला मिळते. ९० चा काळ गाजवणाऱ्या करिश्माचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. परंतु, तिची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. करिश्माच्या फिल्मी करिअरसोबतच तिचं पर्सनल लाइफही बऱ्याचदा चर्चेत आलं. यात तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या चढउतारांची आजही चर्चा होते. एका मुलाखतीत करिश्माने तिच्या नवऱ्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
करिश्माने प्रसिद्ध उद्योजक संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोट घेत असताना करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप केले. यातच लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने तिला विकण्याचा प्रयत्न केला होता असा धक्कादायक खुलासा तिने एका मुलाखतीत केला.
काय म्हणाली करिश्मा?
करिश्मा, संजय कपूरची दुसरी पत्नी असून संजयने नंदिता मेहतानी हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र,त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. परंतु, संजय केवळ श्रीमंत असल्यामुळे करिश्माच्या आईने तिचं लग्न त्याच्यासोबत केलं. नंदिताशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या १० दिवसात त्याने करिश्माशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे लग्नाच्या काही दिवसांमध्येच या दोघांमध्येही वाद होऊ लागले.
लग्नाच्या पहिल्याच रात्री केला करिश्माचा सौदा
करिश्मा आणि संजयने २००३ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर करिश्मा आणि संजय हनिमूनला गेले होते. मात्र, त्याच रात्री संजयने मित्रांसोबत करिश्माची बोली लावली होती. करिश्माने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला.
दरम्यान, करिश्माने २०१६ मध्ये संजयला घटस्फोट दिला. यावेळी तिने संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने प्रिया चटवाल हिच्याशी तिसरं लग्न केलं. तर, करिश्मा सिंगल मदर होऊन दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्माने ‘राजा हिंदूस्तानी’, ‘दिल तो पागल हैं’, ‘राजा बाबू’, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.