90 च्या दशकातली अभिनेत्री करिश्मा कपूर आता ब-याच वर्षापासून सिनेमापासून लांब आहे. सध्या कोणत्याही सिनेमात करिश्मा काम करत नसली तरीही बहिण करिना कपूर खानसह ती विविध पार्टी, लग्नसोहळ्यामंध्ये हजेरी लावताना दिसते. ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. फिटनेसवरही लक्ष देते. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. खासगी आयुष्यात करिश्माने पती संजय कपूरसह काडीमोड घेतल्यानंतर आता ती मुलांसह एकटी राहते.
एक काळ असा होता की, कपूर घराण्याशी संबंध असूनही करिश्मालाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले. ज्यावेळी करिश्माने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी तिच्या लूकमुळे तिला कोणी संधी देत नव्हतं. तिला लेडी रणधीर म्हणून ओळखले जायचे. तर कधी ती मुलासारखी दिसते अशी तिची खिल्ली उडवली जायची. हिरोइन मटेरिअल नसल्याचे तिला बोलले जायचे.
मात्र 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही. एक से बढकर एक संधी तिला मिळत गेल्या.बॉलिवूडमध्ये अनेक ऑफर्स मिळण्याला कारणीभूत ठरला तो तिचा मेकओव्हर. 'राजा हिंदुस्तानी' सिनेमात तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यांनेही तिने रसिकांवर जादू केली होती. आजही 'राजा हिंदुस्तानी' सिनेमा आठवताच करिश्मा कपूर नजरेसमोर येते. त्यामुळे मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात कसे पालटू शकतं हे करिश्माने त्यावेळी सिद्ध केले होते.