Oops! अपनी बहन को कहो इतना पाऊट ना किया करे...; जेव्हा बेबोमुळे ट्रोल होते लोलो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 03:34 PM2019-01-16T15:34:30+5:302019-01-16T15:37:19+5:30
लोलो सतत बेबोचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण कधीकधी हेच, लोलोला महागात पडते. होय, स्वत:मुळे नाही तर बेबोमुळे लोलोला ट्रोल व्हावे लागते.
करिना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी बहिणी असल्या तरी त्यांचे नाते मैत्रिणींसारखे आहे. पार्टी असो वा व्हॅकेशन दोघीही अनेकदा सोबत दिसतात. एकीकडे करिश्मा कपूर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते, दुसरीकडे करिना सोशल मीडियापासून चार हात दूर राहणे पसंत करते. करिनाचे सोशल मीडियापर अनेक फॅन पेजेस आहेत. पण पर्सनल आॅफिशिअल अकाऊंट नाही. अर्थात लोलो बेबोच्या चाहत्यांना निराश न करता, सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण कधीकधी हेच, लोलोला महागात पडते. होय, स्वत:मुळे नाही तर बेबोमुळे लोलोला ट्रोल व्हावे लागते.
अलीकडे करिश्मा कपूर करिनाच्या ‘व्हॉट्स वुमेन वॉन्ट’ या रेडिओ शोवर पोहोचली. यावेळी करिश्माने असा काही खुलासा केला की, करिनाही चाट पडली. होय, मी माझ्यामुळे कमी अन् तुझ्यामुळे अधिक ट्रोल होते, असे करिश्मा यावेळी म्हणाली.
यावेळी करिश्माने एक किस्साही शेअर केला. ‘एकदा मी तुझ्या पाऊटमुळे ट्रोल झाले. तुझ्या बहीणीला सांग, इतके पाऊट करू नकोस म्हणून, असे अनेक युजर्सनी मला लिहिले होते, असे करिश्मा म्हणाली. करिश्माची ही गोष्ट ऐकून करिना पोट धरून हसू लागली, हे सांगणे नकोच.
करिश्मा कपूरचा २०१२ मध्ये ‘डेंजरस इश्क’ नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. तिचा हा कमबॅक चित्रपट बॉक्स आॅफिसवर अयशस्वी ठरला होता. मात्र करिश्मा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रीय असते. ती सतत आपले फोटो पोस्ट करत असते.