फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री करिश्मा कपूरचा.
आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने सा-यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल करिश्माच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. मात्र करिश्माला जास्त तामझाम करणे आवडत नाही. महागडे कपडे घालणे हे केवळ पार्ट्यांपुरतेच ती मर्यांदित ठेवते. करिश्माच्या लाईफस्टाइलवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की,तिलाही तिचे आयुष्य ती अगदी साध्या सरळ साध्या मार्गाने जगते. तिच्या वागण्या, बोलण्यातही कुठलाहीप्रकारचा बडेजावपणा जाणवत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणा-या फोटोंमधील तिने परिधान केलेले कपड्यांनी उपस्थितांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. करिश्माने घातलेल्या टीशर्टची किंमत ही 1200 रू. इतकी असल्याचे बोलले जाते. कोणत्याही शॉपिंग साईटवर तुम्हाला असे टीशर्ट या रकमेत उपलब्ध होतील तुर्तास ड्रेस कोणताही असो करिश्मा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये तितकीच सुंदर दिसते.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती नुकतीच एकता कपूरच्या मेंटलहुड या वेब सीरिजमध्ये झळकत आहे. बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिलेल्या करिश्मानं या वेबसीरिजमधून कमबॅक केलं आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुक सुद्धा झालं. या वेबसीरिजची कथा मातृत्वावर बेतली आहे. जी हे सांगण्याचा प्रयत्न करते की कशाप्रकारे एक आई तिच्या मुलांना सांभाळण्यासोबतच घर-ऑफिस आणि इतर बाहेरच्या जबाबदा-या सुद्धा पार पाडते.