Join us

करिश्मा कपूरने केला इंडस्ट्रीत वर्णभेदाचा सामना; लूकमुळे झालीये अनेकदा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:19 IST

Karisma kapoor: आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. परंतु, एक काळ असा होता जेव्हा करिश्माला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं गेलं.

90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर (karisma kapoor). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर करिश्माने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. त्यामुळे आजही तिचे सिनेमा प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.  आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. परंतु, एक काळ असा होता जेव्हा करिश्माला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं गेलं.

कपूर खानदानाची लेक असलेल्या करिश्माच्या सौंदर्याचे आज अनेक जण चाहते आहेत. आजही वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती तितकीच तरुण आणि सुंदर दिसते. परंतु, करिअरच्या सुरुवातीला कलाविश्वात अनेकांनी तिच्या दिसण्यावरुनच तिला ट्रोल केलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं.

करिश्माने प्रेम कैदी या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार हरीश कुमार याने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या सेटवर अनेकांनी करिश्माच्या लूकची खिल्ली उडवली. अनेक जण तिला 'लेडी रणधीर' अस म्हणत तिची मस्करी करायचे.

दरम्यान, करिश्मा एका फिल्मी बॅकग्राउंडची असूनही इंडस्ट्रीत तिला स्ट्रगल करावा लागला. परंतु, तिने राजा हिंदुस्तानी, खुद्दार, जुडवा, हिरो नंबर १, दिल तो पागल हैं. जुबैदा, राजा बाबू असे कितीतरी सुपरहिट सिनेमा दिलं. अलिकडेच ती नेटफ्लिक्सच्या मर्डर मुबारक या सीरिजमध्ये झळकली होती.

टॅग्स :बॉलिवूडकरिश्मा कपूरसेलिब्रिटीसिनेमा