कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार. त्याने काय करावे तर, यावेळी त्याने थेट करण जोहरला प्रपोज केले. होय, चक्क करणला प्रपोज केले. ‘डियर करण, व्हॅलेन्टाईन डेसाठी माझ्याकडे एकही गर्लफ्रेन्ड नाही. काय तू माझा व्हॅलेन्टाई डे पार्टनर बनशील? तुझ्या उत्तराची प्रतीक्षा असेल,’ असे ट्वीट केआरकेने केले.
केआरकेने करण जोहरला केले ‘प्रपोज’! नेटक-यांनी अशी घेतली मजा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 14:52 IST
कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार?
केआरकेने करण जोहरला केले ‘प्रपोज’! नेटक-यांनी अशी घेतली मजा!!
ठळक मुद्दे ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत.