Join us

कार्तिक अन् सारा अली खान पुन्हा दिसले एकत्र; 'सारापासून दूर राहा' चाहत्यांचा कार्तिकला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 11:06 AM

४ वर्षांनंतर पुन्हा कार्तिक आणि सारा एकमेकांसमोर आले आहेत.

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या नात्याची आणि नंतर ब्रेकअपची चांगलीच चर्चा रंगली. 'लव्ह आज कल २' च्या शूटिंग वेळेस दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता ४ वर्षांनंतर पुन्हा कार्तिक आणि सारा एकमेकांसमोर आले आहेत. यावेळी दोघांमधील बॉंड आधीसारखाच दिसतोय. त्यांना पुन्हा एकत्र आलेलं पाहून चाहते मात्र खूश झाले आहेत.

उदयपूरमध्ये सारा-कार्तिक एकत्र

कार्तिक आर्यन सध्या आगामी 'शहजादा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.प्रमोशनसाठी तो उदयपूरमध्ये असतानाच साराही तिथे असल्याचं दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत हसत हसत गप्पा मारत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.साराने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे तर काळ्या रंगाची जीन्स घातलेली दिसते. तर कार्तिकने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि त्यावर चेक्स शर्ट घातला आहे.

 हे दोघं परत सोबत आले आहेत का अशी शंका चाहत्यांना आली आहे. सारा आणि कार्तिकच्या या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत. 'सार्तिक मॅजिकल आहेत',' असं वाटतंय की काहीच नाही बदललंय सगळं आधीसारखंच आहे. दोघांची नजरानजर बघा.' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे काही चाहते मात्र नाराजही झाले आहेत. कार्तिकच्या चाहत्यांनी त्याला सारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

कार्तिक आर्यंनचा नुकताच 'फ्रेडी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. तर आता तो 'शहजादा' सिनेमाचे प्रमोशन करत आहे. तर सारा लवकरच 'ए वतन मेरे वतन' या आगामी सिनेमात दिसणार आहे. दोघांच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचे तर सारा अली खानचे सध्या भारतीय क्रिकेटपटू 'शुबमन गिल'सोबत नाव जोडले जात आहे. तर कार्तिक आर्यनचे हृतिक रोशनची बहिण 'पश्मिना रोशन'सोबत लिंकअप असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :बॉलिवूडकार्तिक आर्यनसारा अली खानरिलेशनशिप