Kartik Aaryan Birthday Special : चॉकलेटी लव्हर बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करतोय. कार्तिकची आता नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘आऊटसाईडर’ कार्तिकने आता बड्या बड्यांना धक्का देत, बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज कार्तिक तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत. पण फक्त इतकंच नाही. कार्तिकचा इथपर्यंतचा स्ट्रगल मोठा आहे.मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या कार्तिकबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कार्तिकचं खरं नाव...होय, कार्तिक आर्यन हे त्याचं खरं नाव नाही. चित्रपटात येण्याआधी त्याने आपलं नाव बदललं. त्याचं नाव कार्तिक तिवारी आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने तिवारी हटवून त्याठिकाणी आर्यन हे सरनेम धारण केलं.
इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेतलं आणि...कधीकाही कार्तिक लो बजेट चित्रपटाचा हिरो म्हणून ओळखला जायचा. पण ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमानं त्याला एका रात्रीत स्टार केलं. आता तो बॉलिवूडचा ए लिस्टर स्टार आहे. कार्तिकने शिकून डॉक्टर बनावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. पण कार्तिकला हिरो बनायचं होतं. घरच्या दबावापोटी त्याने इंजिनिअररिंगला अॅडमिशन घेतलं. पण हिरो बनण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. मग काय, कार्तिक क्लास बंक करून ऑडिशनला जायचा.
पहिल्याच सिनेमानं केली जादू...कार्तिकने प्रचंड स्ट्रगल केला. बॉलिवूड इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नसताना इथे टिकाव लागणं सोप्प नव्हतं. कार्तिकने सगळं काही सहन केलं. अनेक स्ट्रगलनंतर त्याला पहिला सिनेमा मिळाला तो ‘प्यार का पंचनाम’. पहिलाच सिनेमा हिट गेला. पण कार्तिकला इतकेही पैसे मिळाले नाहीत की तो एक कार घेऊ शकेल. त्यामुळे त्याने एक थर्ड हँड कार घेतली. एक लो बजेट सिनेमा आणि एक थर्ड हँड कार इथून कार्तिकचा फिल्मी सफर सुरू झाला. हाच कार्तिक आज एका सिनेमासाठी 35 ते 40 कोटी फी घेतो. 4.5 कोटींच्या लिंबोर्निगीमध्ये फिरतो.
पावसात ती कार लीकेज व्हायची...‘बॉलिवूड हंगाला’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलला होता. तो म्हणाला होता, ‘मी इंडस्ट्रीत आलो, तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. दोन चित्रपट केल्यानंतर मी पहिली कार खरेदी केली होती. ती सुद्धा थर्ड हँड कार होती. 60 हजार रूपयांची ती कार खरेदी करण्यासाठी सुद्धा मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या कारच्या दरवाज्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. पण तरिही मी ती कार घेतली. कारण मी रिक्षा, बाईकवरून किंवा मग लोकांना लिफ्ट मागून इव्हेंटमध्ये जायचो. मी ती गाडी खासकरून रेड कार्पेटवर जाण्यासाठी घेतली होती. पण त्या गाडीचा ना दरवाजा उघडायचा, ना ती ठीक चालायची. इतकंच नाही तर पावसात ती कार लीकेजही व्हायची. पाऊस आल्यावर ड्रायव्हरची सीट ओली होत होती कारण वर छतामधून पाणी टपकत होतं. पण नंतर मला त्याची सवय झाली होती. कुणाकडून लिफ्ट घेण्यापेक्षा माझी ही कार बरी, असं मला वाटायचं.