Join us

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर हवा फिकी, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:56 IST

'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, प्रेक्षकांवर छाप पाडण्यात हा सिनेमा फारसा यशस्वी झालं नसल्याचं पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा अखेर शुक्रवारी(१४ जून) प्रदर्शित झाला. भारतातील पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात कार्तिकने मुरलीकांत यांची भूमिका साकारली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण, हा सिनेमा प्रेक्षकांच्या तितका पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. 

'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, प्रेक्षकांवर छाप पाडण्यात हा सिनेमा फारसा यशस्वी झालं नसल्याचं पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. 'चंदू चॅम्पियन'  सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केल्याचं दिसत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार 'चंदू चॅम्पियन' सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ ५ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी 'चंदू चॅम्पियन'च्या टीमकडून खास ऑफरही देण्यात आली होती. १५० रुपयांत या सिनेमाचं तिकीट उपलब्ध करून देण्यात आलं होतं. पण, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात हा सिनेमा अपयशी ठरला आहे. आती वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. ट्रेलर पाहूनच सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.  या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीदेखील झळकली आहे. तिने कार्तिकच्या आईची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनसेलिब्रिटी