Join us

कार्तिक आर्यनची फॅन म्हणाली - '२० कोटी देते, माझ्याशी लग्न कर', अभिनेत्याने दिला भारी रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:39 IST

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन हे माहीत आहे की फॅन्सचं मन कसं जिंकायचं. नुकतंच कार्तिकने त्याच्या एका फीमेल फॅनला लाजवलं. त्याने तिचं लग्नाचं प्रपोजल वेगळ्या अंदाजात स्वीकारलं.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्याच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. महत्वाची बाब म्हणजे तो तरूणींमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. त्याला हे माहीत आहे की फॅन्सचं मन कसं जिंकायचं. नुकतंच कार्तिकने त्याच्या एका फीमेल फॅनला लाजवलं. त्याने तिचं लग्नाचं प्रपोजल वेगळ्या अंदाजात स्वीकारलं.

कार्तिकने 'लूडो' फेम बालकलाकार इनायत वर्मासोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओत  इनायत 'धमाका' सिनेमातील कार्तिकचा डायलॉग म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ कार्तिकच्या फॅन्ससोबतच सेलिब्रिटींनाही खूप आवडला आहे.

कार्तिक आर्यनने हा व्हिडीओ एका दिवसाआधी शेअर केला होता. ज्यावर १३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. रोहित बोस रॉयने व्हिडीओवर कमेंटही केली. अशात कार्तिकच्या एका फीमेल फॅनच्या कमेंटनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका फीमेल फॅनने कार्तिक आर्यनला २० कोटी रूपयांच्या बदल्यात तिच्यासोबत लग्न करण्यास सांगितलं. फॅनने लिहिलं की, 'माझ्यासोबत लग्न कर, २० कोटी रूपये देईन'. कार्तिनने यावर आपल्या अंदाज कमेंट केली 'केव्हा?'.

कार्तिक आर्यनच्या रिप्लायवर लोकांच्या भरभरून रिअॅक्शन येत आहेत. कार्तिक आर्यन आपल्या फॅन्ससोबत संवाद साधत असतो. ज्याने त्याचे फॅन्स आनंदी होतात. तो जानेवारीमध्ये दोन तरूणींना भेटला होता. या तरूणी त्याच्या घराखाली येऊन त्याला जोरजोरात आवाज देत होत्या.

कार्तिक आर्यन लवकरच ‘शहजादा’ सिनेमात दिसणार आहे. रोहित धवनचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात मनीषा कोईराला, परेश रावल, रोहित बोस रॉय आणि अंकुर राठी दिसणार आहेत.  

टॅग्स :कार्तिक आर्यनसोशल मीडियाबॉलिवूड