Kartik Aaryan Injured:बॉलिवूड सुपरस्टार कार्तिक आर्यन भारतातील लाखो तरुणांचा क्रश बनला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी वेड्या होतात. दरम्यान, एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान कार्तिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा आता खुलासा झाला आहे. कार्तिकनेही बऱ्याच दिवसांपासून हे गुपित ठेवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका सूत्राने सांगितले की, त्या दिवशी स्टेजवर त्याच्यासोबत जे काही घडलं, ती छोटी गोष्ट नव्हती. तिथे उपस्थित सर्व घाबरले होते. त्या दिवशी कार्यक्रमात कार्तिक 'भूल भुलैया 2' मधील गाण्यावर नाचत होता.
यावेळी गाण्यातील सिग्नेचर स्टेप करत अशताना त्याने पायाचा घोटा फिरवला आणि तो तसाच फ्रीझ झाला. त्याचा पाय इतका वाकला की, त्याला तो स्टेजवर सरळ ठेवता येत नव्हता. त्यावेळी कार्तिक मस्करी करत असल्याचे सर्वांना वाटले. मात्र थोड्या वेळानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे उपस्थितांना जाणवले. कार्तिक तशाच परिस्थितीत नाचत होता, हे पाहून सर्वजण चकीत झाले.
दुखापतीनंतरही कार्तिक स्टेजवरच कार्तिक जखमी झाल्यानंतर सुमारे 20-30 मिनिटे स्टेजवरच होता. स्टेजवरुन उतरल्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याची तपासले. यानंतर कार्तिकला त्याच्या व्हॅनमध्ये परत नेण्यात आले. कार्तिकला कामाची खूप आवड आहे. त्यामुळेच तो या दुखापतीतून झपाट्याने बरा झाला आणि नंतर कामावर परतला.