Join us

साऊथ अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन, आईनेच केलं कन्फर्म! माला तिवारी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:03 IST

कार्तिक अभिनेत्रीहून ११ वर्षांनी मोठा आहे.

बॉलिवूडमधला सर्वात आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) डेटिंगच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. 'चंदू चॅम्पियन','भूलभुलैय्या ३' या दोन सुपरहिट सिनेमांनंतर आता कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक आला होता ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) दिसत आहे. हा सिनेमा 'आशिकी ३' असल्याची चर्चाही झाली. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. दरम्यान नुकतंच कार्तिकच्या आईने लेकाच्या गर्लफ्रेंडबाबत मोठी हिंट दिली आहे.

जयपूर येथे आयोजित आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान कार्तिकची आई माला तिवारी यांनी होणारी सून कशी असावी याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, "कुटुंबाची मागणी आहे की होणारी सून चांगली डॉक्टर हवी'. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. आगामी सिनेमातील कार्तिकची कोस्टार साऊथ अभिनेत्री श्रीलीला  एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे कार्तिकच्या आईचा रोख श्रीलीलाकडेच तर नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. 

कार्तिक आणि श्रीलीला एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. कार्तिकची बहीण एमबीबीएस झाली यानिमित्ताने दिलेल्या पार्टीत कार्तिकसोबत श्रीलीलाही दिसली. श्रीलीला कार्तिकच्या फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. आता कार्तिकच्या आईच्या या विधानाने तर या चर्चा जवळपास कन्फर्मच झाल्या आहेत. विशेष म्हणजे कार्तिक श्रीलीलाहून ११ वर्षांनी मोठा आहे.

श्रीलीलाचं नुकतंच 'पुष्पा २' मधील 'किसीक' हे आयटम साँग गाजलं. कार्तिक आणि श्रीलीला अनुराग बसूच्या आगामी एका सिनेमात दिसणार आहेत. याचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. मात्र सिनेमाचा फर्स्ट टीझर पाहून सर्वांना 'आशिकी ३' असल्यासारखंच वाटत आहे. कार्तिक आणि श्रीलीलाची रोमँटिक लव्हस्टोरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडTollywoodरिलेशनशिपपरिवार