अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'चंदु चॅम्पियन'(Chandu Champion)मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. कार्तिक त्याच्या प्रोफेशनल लाइफव्यतिरिक्त लव्ह लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले. प्रेमात तो अनलकी असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच तो सिंगल असल्याचेही म्हटले. त्याचे नाव सारा अली खान आणि अनन्या पांडेशी जोडले गेले आहे.
राज शमानीच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने म्हटले की, माझ्या खासगी आयुष्यावर एकेकाळी खूप चर्चा झाली होती. तेव्हापासून हेच चालत आले आहे. मी तर खासगीदेखील डेट करत नाही. आता तर भीत भीत फिरतो आहे.
प्रेमात मी अनलकी आहे - कार्तिककार्तिक आर्यन पुढे म्हणाला की, तुम्ही प्रसिद्ध झाल्यानंतर खूप कमी लोकांना भेटता. याचे कारण तुम्ही कामात व्यग्र असता. तुम्ही खूप पैसे कमवता, प्रसिद्धी होतात पण एक गोष्ट नक्की आहे की, तुम्ही प्रेम विकत घेऊ शकत नाही. मी कुणाला डेट करत नाही आहे. मला रोमँटिक हिरोदेखील म्हटले गेले आहे, पण मी प्रेमात अनलकी आहे. मला जेव्हा प्रेम होईल तेव्हा योग्य व्यक्ती मिळो, अशी माझी इच्छा आहे.
सारा अली खानसोबत झाले होते ब्रेकअपलव आज कल सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. मात्र कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले होते. साराने कॉफी विद करण ८मध्ये कोणाचं नाव न घेता कार्तिकला डेट करत असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत साराचं नाव न घेता म्हटलं होतं की, कोणतं नातं का संपुष्ठात येते हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय नसला पाहिजे.
अनन्यासोबतही जोडलं गेलं होतं नाव कार्तिकने म्हटले होते की, त्याला त्याच्या जुन्या नात्यावर बोलायला आवडत नाही. तसेच ब्रेकअप का झाले, हे सांगायलाही आवडत नाही. सारासोबत वेगळे जाल्यानंतर पती पत्नी और वोच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचे नाव अनन्या पांडेसोबत जोडले गेले होते.