‘सोनू की टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटांमुळे अचानक प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन याच्या हाती एक मोठा चित्रपट लागला होता. पण केवळ अतिउत्साहामुळे कार्तिकला हा चित्रपट गमवावा लागला.बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात करिना कपूर आणि अक्षय कुमारला लीड रोलमध्ये होते आणि कार्तिकला सर्पोटींग रोलमध्ये घेतले जाणार होते. कार्तिक लवकरच हा चित्रपट साईन करणार होता. याचसाठी कार्तिकच्या पीआर टीमने करण जोहरच्या कार्यालयाशी संपर्क साधला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक व त्याच्या टीमचा अतिउत्साह याला कारणीभूत होता. होय, धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटासाठी कार्तिकच्या नावाची अधिकृत घोषणा केली नव्हती, त्याने हा चित्रपट साईनही केला नव्हता. तरिही कार्तिकच्या पीआरटीने ही बातमी कन्फर्म केली. धर्मा प्रॉडक्शनला ही गोष्ट खटकली आणि त्यांनी कार्तिकला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. एकंदर काय तर कार्तिक व कार्तिकच्या टीमला अतिउत्साह नडला. कार्तिकची ही भूमिका दिलजीत दोसांजच्या झोळीत पडल्याचेही कळतेय.या चित्रपटाच्या निमित्ताने करिना करण जोहरसोबत सुमारे १७ वर्षांनी काम करणार आहे. अक्षय व करिना यांचे म्हणाल तर ही जोडी ‘गब्बर इज बॅक’मध्ये अखेरची दिसली होती.
कार्तिक आर्यन लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'किरिक पार्टी' हा कन्नड चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि हा चित्रपट शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात होता. कन्नडमध्ये जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून इंजिनिअरिंग महाविद्यालयात फर्स्ट इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा रेखाटण्यात आली आहे.