Join us

Bhool Bhulaiyaa 2:  आता घरबसल्या पाहता येणार ‘भुल भुलैय्या 2’, ‘या’ दिवशी येतोय OTT वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:19 IST

Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: होय, बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. 

Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan )आणि कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) ‘भुल भुलैय्या 2’नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अगदी अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमालाही ‘भुल भुलैय्या 2’नं धूळ चारली.  ‘भुल भुलैय्या 2’नं आत्तापर्यंत 176.14 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या 27व्या दिवशी या चित्रपटाने 1 कोटी 26 लाखांचा गल्ला जमवला. कार्तिक आर्यनचा चार्म अन् त्याची अ‍ॅक्टिंग स्किल पाहून चाहते खूश्श आहेत. तुम्ही अद्यापही हा सिनेमा पाहिला नसेल तर आता घरबसल्या तुम्ही हा सिनेमा पाहू शकणार आहात. होय, बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. 

‘भुल भुलैय्या 2’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. पण आता नेटफ्लिक्सची रिलीज डेटही आली आहे. येत्या 19 जूनपासून म्हणजे येत्या रविवारपासून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रिम होणार आहे.

गेल्या 20 मे रोजी हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने 14.11 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाच्या कमाईनं असा काही वेग पकडला की, दोनच आठवड्यात कमाईचा आकडा 100 कोटींवर पोहोचला. लवकरच हा सिनेमा 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आहे.

‘भुल भुलैय्या 2’ मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘भुल भुलैय्या ’ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिषा पटेल, विद्या बालन आणि शायनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘भुल भुलैय्या 2’ मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :भूल भुलैय्याकार्तिक आर्यननेटफ्लिक्स