कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) बॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी पैकी एक आहे. सध्या अभिनेत्याची 'भूल भूलैया-3' मुळे सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्याचा हा सिनेमा दणक्यात कमाई करतोय. कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयानेच नाही तर हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण, कार्तिकचा हा प्रवास सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कार्तिकने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करुन मोठं नाव कमावलं आहे.
आज कोटींमध्ये कमावणाऱ्या कार्तिकला कार्तिक आर्यनला पहिला सिनेमा अर्थात 'प्यार का पंचनामा'साठी फक्त 70 हजार रुपये मिळाले होते. पुढे TDS वगैरे कापून कार्तिकच्या हातात पहिल्या सिनेमासाठी 63 हजार रुपये आले होते. 'प्यार का पंचनामा' आणि 'प्यार का पंचनामा 2'नंतर कार्तिकला 'सोनू के टीटू की स्वीटी' हा सिनेमा मिळाला. या सिनेमातील कार्तिकचा अभिनय पाहून चाहते प्रभावित झाले. यानंतर मात्र त्याच्या करिअरने गाडी पकडली.
एकेकाळी रेड कार्पेट इव्हेंटमध्ये जाण्यासाठी कार्तिककडे स्वतःची कारही नव्हती. आज तोच कार्तिक एका चित्रपटासाठी 35-40 कोटी रुपये घेतो. आता त्याच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. 12 वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत, कार्तिकने 16 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 8 हिट ठरले आहेत. कार्तिकने केवळ आपल्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत नाव कमावले नाही तर तो संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
कार्तिकच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंल आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'लव्ह आज कल 2' या चित्रपटात कार्तिक आणि सारा अली खानची जोडी खूप आवडली होती. त्यांच्या डेटींगच्या अफवा पसरल्या होत्या, पण दोघांनीही ते कधीच अधिकृत केले नाही. मात्र, 'कॉफी विथ करण' या शोमध्ये साराने कबूल केले की ती कार्तिकला डेट करत होती, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.