Join us  

कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकलं नाही अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’चं हिंदी व्हर्जन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 2:09 PM

Kartik Aaryan : होय, चित्रपट निर्माता मनीष शाह यांनी कार्तिकवर ‘अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला आहे. यामुळे आपल्याला 20 कोटींचा तोटा सहन करावा लागला, असा दावाही त्यांनी केला आहे. 

करण जोहरने ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातून कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) हकालपट्टी केली, त्यावर बराच खल पडला होता. कार्तिकचे चाहते यामुळे चांगलेच भडकले होते. करणने कार्तिकवर ‘अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा एका निर्मात्याने कार्तिकवर हाच आरोप केला आहे. होय, चित्रपट निर्माता मनीष शाह यांनी कार्तिकवर ‘अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला आहे.  कार्तिक आर्यनने दिलेल्या धमकीमुळे साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ( Allu Arjun) ‘अला वैकुंठपुरमलो’ (Ala Vaikunthapurramuloo) या तेलगू सिनेमाचं हिंदी व्हर्जन चित्रपटगृहांत रिलीज होऊ शकलं नाही. यामुळे आपल्याला 20 कोटींचा तोटा सहन करावा लागला, असा दावा त्यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरणसाऊथ स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यानंतर अल्लूच्या ‘अला वैकुंठपुरमलो’ या तेलगू सिनेमाचं हिंदी व्हर्जन उद्या 26 तारखेला चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. पण अचानक हा बेत रद्द करण्यात आला . ‘शहजादा’ च्या ( Shehzada) मेकर्समुळे आणि कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे हा बेत रद्द करण्यात आल्याचे मनीष शाह यांनी म्हटले आहे.‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी रिमेक ‘शहजादा’ या नावाने बॉलिवूडमध्ये तयार होत आहे. हा सिनेमा रोहित धवन दिग्दर्शित करत असून यात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहेत.   ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी रिमेक प्रदर्शित झाला तर त्याचा थेट परिणाम ‘शहजादा’वर झाला असता. त्यामुळे ‘शहजादा’च्या मेकर्सनी याला विरोध केला आणि या विरोधामुळे ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी डब व्हर्जन सिनेमागृहांत रिलीज करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. यावर निर्माता मनीष शाह यांनी पहिल्यादा प्रतिक्रिया दिली आहे.

मनीष शाह म्हणाले, ‘अला वैकुंठपुरमलो’चे हिंदी डब व्हर्जन चित्रपटगृहांत रिलीज व्हावा, अशी ‘शहजादा’च्या इच्छा नव्हती. ‘अला वैकुंठपुरमलो’चं हिंदी व्हर्जन चित्रगृहात रिलीज झालं तर आपण ‘शहजादा’मधून बाहेर पडू अशी धमकी कार्तिक आर्यनने दिली होती. कार्तिक आर्यन ‘शहजादा’मधून बाहेर पडला असता तर मेकर्सला 40 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं असतं. कार्तिकचं हे वागणं अतिशय अन-प्रोफेशनल आहे. ‘शहजादा’ हा सिनेमा अल्लू अरविंदने प्रोड्यूस केला आहे. त्याचं नुकसान मला नको होतं. म्हणून मी  ‘अला वैकुंठपुरमलो’ हिंदीत रिलीज करण्याचा निर्णय बदलला. हे मी कार्तिक आर्यनसाठी नाही तर अल्लू अरविंद यांच्यासाठी केलं. कार्तिक आर्यनसाठी इतका मोठा निर्णय बदलण्याचं काहीही कारण नव्हतं. मी तर त्याला ओळखतही नाही.

माझ्या निर्णयामुळे अल्लू अरविंद यांचे 40 कोटींचं नुकसान टळलं. पण माझं 20 कोटींचं नुकसान झालं. फक्त  ‘अला वैकुंठपुरमलो’ च्या डबिंगवर मी 2 कोटी रूपये खर्च केले होते. ‘पुष्पा’नंतर  ‘अला वैकुंठपुरमलो’ हिंदी रिलीज झाला असता तर मोठा फायदा झाला असता. पण आता नुकसान टाळण्यासाठी मी माझ्या चॅनलवर  ‘अला वैकुंठपुरमलो’ चं हिंदी व्हर्जन रिलीज करणार आहे, असं मनीष शाह यांनी सांगितलं. 

टॅग्स :कार्तिक आर्यनअल्लू अर्जुन