Join us

Kartik Aryan, Sara Ali Khan : कार्तिक आर्यन व सारा अली खानच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल, ढसाढसा रडली अभिनेत्री...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 4:37 PM

Kartik Aryan, Sara Ali Khan : व्हिडीओत सारा रडताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) व सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा होती. खरं तर बॉलिवूड डेब्यूच्या आधीपासूनच साराला कार्तिक आवडायचा. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये कार्तिकवर क्रश असल्याचं सारानं अगदी खुल्लमखुल्ला सांगितलं होतं. यानंतर आपल्या याच क्रशसोबत ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात काम करण्याची संधी साराला मिळाली आणि शूटींगदरम्यान दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येणं सुरू झालं. या काळात दोघंही अनेकदा एकत्र दिसले. पण ही लव्हस्टोरी फार काळ चालली नाही.

‘लव्ह आज कल 2’चं शूटींग संपलं, तसं दोघांचं नातं सुद्धा संपलं. दोघांचेही मार्ग वेगळे झालेत. अगदी सोशल मीडियावरही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं. यादरम्यान सारा व कार्तिक ना कधी डेटिंगवर बोलले, ना ब्रेकअपवर. पण आता कार्तिकने ब्रेकअपच्या टाइमिंगबद्दल एक खुलासा केला आहे. आता या दोघांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ‘लव्ह आज कल 2’च्या प्रमोशनदरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे.व्हिडीओत सारा व कार्तिक एका ऑटोरिक्षात एकमेकांशी वाद घालताना दिसतात. अचानक सारा काहीशा रागाने रिक्षातून उतरते आणि ढसाढसा रडायला लागते. हा व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे. असं काय झालं की सारा इतकी ढसाढसा रडतेय, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

आईमुळे झालं ब्रेकअप?सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीत साराची मॉम अमृता सिंग ‘विलन’ ठरल्याच्या चर्चाही जोरात होत्या. रिपोर्टनुसार, आपल्या लेकीनं करिअरवर फोकस करावा, तिने कुठल्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नये, अशी अमृताची इच्छा होती. आईच्या याच इच्छेखातर म्हणा वा दबावापोटी म्हणा साराने रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्तिकआधी सुशांत सिंग राजपूतसोबतही साराचं नाव जोडलं गेलं होतं.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन