Kartik Aaryan-Pashmina Roshan Love Affair:बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत आपल्या पर्सनल लाईफला घेऊन ही चर्चेत असतो. सध्या कार्तिक तिच्या लव्हलाईफला घेऊनही सध्या चर्चेत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत दरम्यान कार्तिकनं आपल्या लग्नाला अजून दोन ते तीन वर्षे बाकी असल्याचं सांगितलं होतं. यानंतर एक रिपोर्ट समोर आला, ज्यामध्ये कार्तिक आर्यनचे नाव हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन (Pashmina Roshan) शी जोडलं गेले.
कार्तिक आर्यन लवकरच करणार साखरपुडा?कार्तिक आर्यनने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो फ्रान्सचा आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन बाहेर बघताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पश्मिना रोशनचाही एक फोटो फ्रान्समधून समोर आला होता. त्या फोटोत पश्मिना रोशन तिचा चुलत भाऊ हृतिक रोशनसोबत दिसली होती. जेव्हापासून या दोघांचे फोटो एकाच ठिकाणी समोर आले, तेव्हापासून कार्तिक आणि पश्मिना या वर्षी एंगेजमेंट करू शकतात असा अंदाज चाहत्यांनी लावला. कार्तिकच्या या पोस्टवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत. कार्तिक आणि पश्मिनाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सारा अली खानसोबत जोडले होते कार्तिकचं नावकार्तिक आर्यनचे नाव पश्मिना रोशनच्या आधी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबतही जोडले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, या दोघांचे अफेअर काही दिवस चालले होते, मात्र दोघांनीही अफेअरच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.