Join us

बिग न्यूज! कार्तिक आर्यनने साईन केला ‘Aashiqui 3’; पाहा पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:00 IST

Aashiqui 3 : आशिकी आणि आशिकी 2 हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. आता ‘आशिकी 3’ची तयारी सुरू झाली आणि यात कार्तिकची वर्णी लागलेली पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) करिअरची गाडी सध्या सूसाट धावतेय. यावर्षी आलेला त्याचा ‘भुलभुलैय्या 2’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर त्याच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. ‘शहजादा’चं शूटींग पूर्ण झालं आहे आणि कालपरवा त्याने ‘सत्यप्रेम की कथा’चं शूटींग सुरू केलं आहे. आता काय तर कार्तिकच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. होय, कार्तिक आता ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या सुपरहिट फ्रेंन्चाइजीमध्ये झळकणार आहे.

आशिकी आणि आशिकी 2 हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. आता ‘आशिकी 3’ची तयारी सुरू झाली आणि यात कार्तिकची वर्णी लागलेली पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. कार्तिकने स्वत: याबद्दलची घोषणा केली.

‘आशिकी 3’चं दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. अनुराग बासू यांच्यासोबत काम करण्यास कार्तिक प्रचंड उत्सुक आहे. ‘आशिकी’ हा एक असा सिनेमा आहे, जो पाहून मी मोठा झालो आहे. ‘आशिकी 3’मध्ये काम करणं हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासाखं आहे. भूषण कुमार व मुकेश भट यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय, यासाठी मी नशीबवान आहे. बासू दा यांच्यासोबत हा माझा पहिला सिनेमा असणार आहे. त्याचाही खूप आनंद आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या अपोझिट कोण दिसणार? ‘आशिकी 3’मध्ये कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल, अशी आशा करूया.

1990 साली रिलीज झालेला ‘आशिकी’ हा सिनेमा महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट इतका गाजला होता की अनु व राहुल रॉय एका रात्रीत स्टार झाले होते. या चित्रपटाची गाणी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. 2013 मध्ये ‘आशिकी 2’ हा सिनेमा आला. मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर व आदित्य रॉय लीड रोलमध्ये होते. हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला होता. आता कार्तिकचा ‘आशिकी 3’ बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो, ते बघूच.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूड