'सोनू की टीटू की स्वीटी' सुपरहिट झाल्यानंतर कार्तिक आर्यनने वाढवली फीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 7:14 AM
प्यार का पंचनामा आणि सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात जबरदस्त अॅक्टिंग करणाऱ्या कार्तिक आर्यनला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येतायेत. ...
प्यार का पंचनामा आणि सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात जबरदस्त अॅक्टिंग करणाऱ्या कार्तिक आर्यनला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येतायेत. दिग्दर्शत संजय लीला भन्साळी आणि दिनेश विजन यांनी त्याला चित्रपटांच्या ऑफर्स दिल्या आहेत. 'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमावल्यानंतर कार्तिकची डिमांड वाढली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कार्तिकने वाढती लोकप्रियता बघून त्यांने आपल्या मानधनात वाढ केली आहे. सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिकने 1 कोटींचे मानधन घेतले होते. अजून पर्यंत हे कळू शकले नाही की कार्तिकने आगामी चित्रपटासाठी मेकर्सकडे किती फिस मागितली आहे. नुकताच कार्तिकला Best Entertainer of The Year दादासाहेब फाळके अॅवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकने करिना कपूरसोबत रॅमवॉक केले होते. कार्तिक व करिना दोघांनी मनिष मल्होत्राच्या एका फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केला होता. यानंतर लगेच कार्तिकने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर करिनासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ कार्तिक करिनासाठी ‘बनजा तू मेरी रानी...’ हे गाणे गात करिनाला इम्प्रेस करताना दिसतोय. अर्थात कार्तिकचे हे गाणे ऐकून करिना नावाची ही ‘रानी’ त्याच्यावर मेहरबान व्हावी, याआधीचं लोकांनी कार्तिकला गदागदा हलवून जागे केले. ALSO READ : काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर??कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.