अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. साउथ अभिनेत्री श्रीलीलासोबत (Sreeleela) तो रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच त्यांचा नवीन सिनेमा भेटीला येणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित हा सिनेमा 'आशिकी ३' च असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झाले नसून टायटलही समोर आलेलं नाही. आता नुकतंच कार्तिक आर्यनने श्रीलीलासोबत फोटो शेअर केला आहे.
मेरी जिंदगी है तू
कार्तिक आर्यन सध्या आगामी सिनेमासाठी खास लूकमध्येच दिसत आहे. वाढलेले केस, लांब दाढी अशा लूकमध्ये तो सगळीकडे फिरत आहे. कार्तिकने त्याची हिरोईन श्रीलीलासोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने पिंक स्वेटशर्ट घातला आहे. तर समोर श्रीलीला बसली आहे. तिने गुलाबी वनपीसमध्ये तीही सुंदर दिसत आहे. कार्तिक तिच्याकडे खूप प्रेम बघत आहे. तर आजूबाजूला दार्जिलिंगमधील मळे आहेत. दार्जिलिंगच्या सिलीगुरीमधला हा फोटो आहे. 'मेरी जिंदगी है तू' असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
'बहुप्रतिक्षित लव्हस्टोरी','पूर्ण गाण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही','क्युट जोडी' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दोघांच्या सिनेमात 'मेरी जिंदगी है तू' हे गाणं आहे जे अजून रिलीज झालेलं नाही. सध्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तर यावर्षी दिवाळीलाच सिनेमा रिलीज होणार आहे.